Share

सँपल घेण्याआधीच Collected चा मेसेज आल्याने काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह भडकले

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच, येत्या काळात अनेक राज्यात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

मात्र या संकट काळात आरोग्य व्यवस्थेवर ताण आलेला असताना यामध्ये रुग्णालयांकडून अनेक गैरप्रकार झाल्याचे देखील समोर येतात त्यामध्ये आता थेट काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांच्यासोबत देखील असाच एक प्रकार झाल्याचं समोर आलं आहे.

दिग्विजय सिंह आज कोरोना टेस्ट करणार होते, मात्र सँपल देण्याआधीच त्यांना एक मेसेज आला, ज्यामध्ये लिहिले होते की ‘तुमचं सँपल कलेक्ट करण्यात आले आहे.’ त्यावर दिग्विजय यांनी ट्विटरवरून प्रश्न उपस्थित केला आहे.

यावर सिंह यांनी ‘हे काय सुरू आहे? 10:02 झाले आहेत आणि मी RTPCR सँपल दिलेलं नाही. सँपल गोळा करण्यास अजून कुणी आलेलं नाही. तरी मला 9:39 वाजता संदेश आला आहे की, सँपल घेतलं आहे आणि आरएमएला पाठवण्यात आलं आहे. मला कळत नाही हे काय सुरू आहे?’

त्यानंतर मध्यप्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून तांत्रिक गडबड समाजावली आणि त्यानंतर सँपल घेण्यासाठी व्यक्ती आला. हे सँपल घेतल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी आधीचे ट्विट डिलिट केलं. तसेच मेसजचा गोंधळ झाला होता तो आता संपल्याचं सांगितलं. तसंच सँपल घेतल्यानंतरच मेसेज आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!