लातूर: जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढतोय तर दुसरीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, अशीच एक घटना लातूर शहरात घडली जबरी चोऱ्या व घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या तीन आरोपींनी बुधवारी दुपारी पोलीस कोठडीच्या खिडकीचे गज वाकवून धूम ठोकल्याची घटना येथील गांधी चौक पोलीस ठाण्यात घडली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जंगजंग पछाडून एका आरोपीच्या मुसक्या उस्मानाबादेत आवळल्या. मात्र, अन्य दोघा आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नाही. याबाबत पोलिसांनीच दिलेली माहिती अशी की, औसा, भादा, विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांमध्ये चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आला होता.
अमोल उर्फ पप्पू भागवत शिंदे, अजय उर्फ दुडी सुरकास पवार व रामाचारी बिस्किट उर्फ रामन्ना पवार हे तीन आरोपी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुरनं. ५६/२०२१ कलम ३७९, ३४ भादंविखाली येथील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या कोठडीत अटकेत होते. १४ एप्रिल रोजी दुपारी एक-दीड वाजेच्या सुमारास एका लोखंडी रॉडने खिडकीचे गज वाकवून पसार झाले.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊनची मुदत वाढविण्याची वेळ आणू नका, पालकमंत्री अमित देशमुख यांचे आवाहन
- जेव्हा खासदार मुंडे डॉक्टर म्हणून रुग्णालयात जातात!
- सामना जिंकल्यावर ट्रेन्ट बोल्ट म्हणाला ”बहुत अच्छा”
- शरद पवार यांना ब्रीच कँडीमधून मिळाला डिस्चार्ज; तब्येत उत्तम – नवाब मलिक
- ‘बंद काळात रिकाम्या थाळ्या वाजवून पोट भरणार नाही, भरलेल्या थाळ्याच द्याव्या लागतील’…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

