टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यानुसारच भाजप आणि शिवसनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे.
याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या परळीतील वैजनाथ मंदिर आणि रस्ते विकास कामांच्या शुभारंभ सोहळ्यादरम्यान उपस्थितांसोबत संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवर खोचक टीका केली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की,’बारामतीतील नेते येऊन माझ्यावर आरोप करतात पंकजा मुंडेंना परळीचं ज्योतिर्लिंग वाचवता आलं का? तुमचं तुम्ही पाहा ना? आधी तुमचा पक्ष वाचवा, तुमच्या आजूबाजूला बसणारे उद्या कोणत्या पक्षाच्या मंचावर बसतील हे सांगता येत नाही, लागले टीका करायला’ अशा शब्दात पंकजांनी विरोधकांना खडेबोल सुनावलेत.
दरम्यान, पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मला बीड जिल्हा मराठवाडा, संपूर्ण महाराष्ट्र बुक करायचा आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताच सरकार आणायचं आहे, असे म्हणत मनातल्या मुख्यमंत्रिपदाची अपेक्षाही यावेळी पंकजांनी व्यक्त केली. तसेच लायकी नसणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्याची लायकी कमी होते. परळीचे लोक हुशार आहेत, लोकल निवडणुकीत लोकल नेत्याला पकडता आणि मोठ्या निवडणुकीत मोठ्या नेत्यांना साथ देतात’, असं म्हणत पंकजांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडलं.
महत्वाच्या बातम्या
कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र झाला, आता राष्ट्रवादी मुक्त करण्यासाठी सज्ज व्हा : पंकजा मुंडे
नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत फडणवीसांचे सूचक वक्तव्य, म्हणाले…


