Share

राष्ट्रवादीला धक्का, सुनील तटकरेंचा पुतण्या शिवसेनेच्या वाटेवर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा पुतण्या शिवसेनेच्या वाटेवर आहे. हा तटकरे कुटुंबाला धक्का असणार आहे. तसेच राष्ट्रवादीसाठीही हा धक्का असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अवधूत तटकरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येतीय. अवधूत तटकरे हे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे याआधीही अवधूत यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का असेल.

कोण आहेत अवधूत तटकरे?

आमदार अवधूत तटकरे हे तटकरे कुटुंबातील एक बडे प्रस्थ आहेत. रोह्याचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान आमदार, प्रशासन आणि पक्षात दबदबा असणारे आक्रमक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. यामुळे एकेकाळी सुनील तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून अवधूत यांची ओळख होती. त्यांच्या आक्रमक आणि राजकीय महत्त्वाकांक्षा हा सुनील तटकरे यांच्यासाठी कायमच अडचणीचा विषय ठरली आहे. सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर आमदारकी आपल्यालाच मिळाली पाहिजे, असा दावा करत अवधूत यांनी यांनी सुनील तटकरे यांनाच आव्हान दिले होते. यानंतर तटकरे काका पुतण्या मध्ये वाद सुरू झाल्याचे बोलले जाते आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!