Share

Chandrashekhar Bawankule | राष्ट्रवादीत अजित पवार नाराज?; बावनकुळे म्हणाले, “ते काय सांगतील आणि…”

Published On: 

🕒 1 min read

Chandrashekhar Bawankule | सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा सुरू अनेक दिवस चालू आहे. आज अखेर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपण नाराज नसल्याचं सांगितलं आहे. शिवाय आपण परदेशात खासगी दौऱ्यावर गेलो असल्याचंही ते म्हणाले. त्यांच्या नाराजीच्या चर्चांबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी पवारांच्या नाराजीबद्दल मत मांडलं. ते म्हणाले, अजित पवार नेमकं काय करतील? हे कुणालाच कळणार नाही. ते काय सांगतील आणि काय करतील, हे केवळ अजित पवारांनाच माहीत असतं, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना बावनकुळेंनी शरद पवारांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादीचा राज्यात बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न होता. तो त्यांनी यशस्वी केला. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर एकप्रकारे जादूटोणा करण्याचा हा प्रकार होता. तो त्यांनी केला, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणालेत.

त्या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत गेले. शरद पवार हेच या जादूटोण्याचे भोंदूबाबा असल्याचं ते अप्रत्यक्षपणे म्हणाले. पुढे ते म्हणाले, भोंदूबाबा कोण आहे हे देशाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे. परत परत सांगायची गरज नाही. एकदा शरद पवारांच्या ताब्यात कोणी आला तर तो सुटत नाही, असा अशी बोचरी टीका त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!