🕒 1 min read
Chandrashekhar Bawankule | सातारा : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीयेत, तर शिंदे विरुद्ध ठाकरे गट यांच्यात देखील चांगलाच वाद पेटलेला आहे. अशातच चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादीचा राज्यात बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न होता. तो त्यांनी यशस्वी केला. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर एकप्रकारे जादूटोणा करण्याचा हा प्रकार होता. तो त्यांनी केला, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणालेत.
त्या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत गेले. शरद पवार हेच या जादूटोण्याचे भोंदूबाबा असल्याचं ते अप्रत्यक्षपणे म्हणाले. पुढे ते म्हणाले, भोंदूबाबा कोण आहे हे देशाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे. परत परत सांगायची गरज नाही. एकदा शरद पवारांच्या ताब्यात कोणी आला तर तो सुटत नाही, असा अशी बोचरी टीका त्यांनी केली.
महाविकास आघाडीचे नेते सत्ता गेल्याने अस्वस्थ झाले असल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे करणाऱ्यांना भिती आहे म्हणून आरोप होत आहेत. त्यांच्या काळात ईडी, सीबीआय होती. त्यावेळी त्यांनी त्यांचा वापर का केला नाही? असा सवालही बावनकुळेंनी केलाय.
महत्वाच्या बातम्या :
- PM Kisan Yojana | ‘या’ एका चुकीमुळे 17 हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही पीएम किसान योजनेचे पैसे
- Ajit Pawar | “दादा वाचून यांचं काय नडतं कुणाला माहिती” ; नाराजीच्या चर्चेनंतर अजित पवार पहिल्यांदा बोलले
- MS Dhoni | क्रिकेट मैदानानंतर महेंद्रसिंग धोनी दिसणार आता मोठ्या पडद्यावर
- Udayanraje bhosale | ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न’; यावर उदयनराजे म्हणतात…
- Thackeray vs FadnAvis | तपास यंत्रणाच्या कारवायांवरुन ठाकरे-फडणवीस सामना रंगला! वार-पलटवार वाचा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
