Share

An Action Hero | इंटेन्स लुकसह आयुष्यमान खुराणाच्या ‘ॲन ॲक्शन हिरो’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवुड (Bollywood) अभिनेता आयुष्यमान खुराना (Ayushyaman Khurana) सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘ॲन ॲक्शन हिरो’ (An Action Hero) मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर (Trailer) रिलीज झाला असून तो सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. अनिरुद्ध अय्यर दिग्दर्शक या चित्रपटांमध्ये आयुष्यमान खुराना जबरदस्त ॲक्शन मध्ये दिसत आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील आयुष्यमान खुराणाचा इंटेन्स लुक देखील चाहत्यांना खूप आवडत आहे.

ॲन ॲक्शन हिरो या चित्रपटांमध्ये आयुष्यमान खुराना पहिल्यांदाच अभिनेता जयदीप अहवालसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटांमध्ये जयदीप राजकीय नेत्याची भूमिका पार पडणार आहे. तर दुसरीकडे आयुष्यमान ॲक्शन मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते त्याला चाहत्यांकडून चांगलीच दाद मिळाली असून चित्रपटाच्या ट्रेलरची देखील चाहते प्रशंसा करत आहेत.

‘ॲन ॲक्शन हिरो’ (An Action Hero) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

‘ॲन ॲक्शन हिरो’ आयुष्यमान खुरानाच्या आगामी चित्रपटाचे आज ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर सुरू होताच, आयुष्यमान त्याच्या कार मध्ये बसून काहीतरी विचार करताना दिसत आहे. तेवढ्यात जयदीप तिथे येतो आणि त्याला विकीचा मृत्यू कसा झाला याबद्दल प्रश्न विचारतो. त्यानंतर विकीला शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. या चित्रपटांमध्ये अभिनेता आयुष्यमान खुराना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे आयुष्यमान म्हणतो, “लढणे हे माझे काम आहे छंद नाही.” त्याचबरोबर या चित्रपटामध्ये मलाइका अरोरा देखील एक आयटम सॉंग करताना दिसली आहे.

‘ॲन ॲक्शन हिरो’ कधी होणार रिलीज

बॉलीवूड सुपरस्टार आयुष्यमान खुराना यांचा ‘ॲन ॲक्शन हिरो’ हा चित्रपट दोन डिसेंबर रोजी चित्रपट गृहानमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून चाहत्यांकडून या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटातील इतर कलाकार

‘ॲन ॲक्शन हिरो’ या चित्रपटांमध्ये अभिनेता आयुष्यमान खुराना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रांमध्ये जयदीप अहवाल सुद्धा दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये अभिनेता अक्षय कुमार छोट्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!