Share

Chandrashekhar Bavankule | “2024पर्यंत उद्धव ठाकरेंकडे फक्त काही लोक शिल्लक उरतील”, चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

Published On: 

मुंबई : शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांनी पाच हजाराहून अधिक शिवसैनिकांसोबत आज भाजप पक्षात प्रवेश केला आहे. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आणखीनही पदाधिकारी भाजपमध्ये यायला इच्छुक असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोलः

उद्धव ठाकरे यांच्याकडे 2024पर्यंत केवळ काहीच लोक शिल्लक राहतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बावनकुळेंचं हे भाकीत आहे की यामागे भाजपची काही गणितं आहेत? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वानखेडे यांच्यानंतर लवकरच संपूर्ण अमरावती लोकसभा, तिवसा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करतील, शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपच्या संपर्कात असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं आहे. गेल्या अडीच वर्षांच्या सरकारला सर्वच जण कंटाळलेले असून आता जनतेच्या मनातलं हे सरकार आहे. प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडणार आहे, असा दावा त्यांनी केला.

2024पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतीलः

उद्धव ठाकरेंकडे असलेले कार्यकर्ते शिंदे गटात आणि भाजपात येत आहेत. 2024पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील. विदर्भातील एकही कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार नाही, असंही ते म्हणाले. आपण आश्चर्यचकित व्हाल असे प्रवेश भाजपमध्ये होणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!