मुंबई : पत्राचाळ प्रकरणातील गैरव्यवहार प्रकारणामध्ये ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर अद्याप त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संकटाच्या काळात संजय राऊतांची भेट घेयची आहे. याला काल नकार देण्यात आला होता. मात्र आता ठाकरेंना शक्य होईल अशी शक्यता आहे.
उद्धव ठाकरे घेऊ शकतील संजय राऊत यांची भेटः
ठाकरेंना या भेटीसाठी कोर्टाची परवानगी घेण्याचे निर्देश आर्थर रोड कारागृह प्रशासनाने दिल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता ठाकरेंना राऊत यांची भेट घ्यायची असल्यास कोर्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे. उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांची स्वातंत्र भेट हवी आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जेलरकडे विनंती केली होती.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना जेलरच्या रुममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र अशी विशेष परवानगी देता येणार नाही. इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेंना राऊत यांना भेटता येईल, असं तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. त्याचबरोबर जर स्वातंत्र भेट घेयची असेल तर न्यायालयात जाण्याचा पर्याय देखील तुरुंग प्रशासनाकडून सुचवण्यात आलाय.
महत्वाच्या बातम्याः
- Nitesh Rane | “धर्मपरिवर्तनाला जे लोक समर्थन करतील त्यांना…”; राणेंचा इशारा
- Dhananjay Munde | “भाजपचं मिशन राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्ल्यात फेल होणार”; धनंजय मुंडेंची भविष्यवाणी
- Nitesh Rane | याकुब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरण झालं, याला उद्धव ठाकरे जबाबदार – नितेश राणे
- Udayanraje Bhosale | “राजेशाही असती तर…”; याकूब मेमन प्रकरणावर उदयनराजे यांनी केलं वक्तव्य
- Radhakrishna Vikhe Patil | “राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सोडून काँग्रेस छोडो…”, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

