Share

‘ओबीसींना फसवण्याचं काम या सरकारमध्ये चाललंय’; फडणवीसांचा गंभीर आरोप

Published On: 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणावरुन केंद्र सरकरावर केलेल्या आरोपावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचला.

‘शरद पवारांना हे चांगलं माहिती आहे की, इतर राज्यांतील ओबीसी आरक्षण सुरु आहे. ते कुठेही गेलेलं नाही. फक्त महाराष्ट्रातील राजकीय ओबीसी आरक्षण गेलेलं आहे. हा महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा आहे. तो आणखी सुरु आहे’, असा आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही. या सरकारला फक्त महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत चालढकल करायची आहे. फक्त कारणं सांगायची आहेत’, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

‘ओबीसी आयोगाने स्वत: राज्य सरकारकडे निवेदन पाठवलं आहे की, आम्हाला पैसे द्या आम्हाला इम्पेरिकल डाटा जमा करायचा आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी आम्ही ४ महिन्यांत इम्पेरिकल डाटा जमा केला होता. सरकारच्या मनात असेल तर होऊ शकेल पण सरकारच्या मनात नाही हे स्पष्ट आहे,’ असाही आरोप यावेळी फडणवीसांनी केला आहे.

शरद पवारांनी केंद्र सरकारवर काय आरोप केलाय?

दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने राज्याचे अधिकार काढून घेतले होते. आता संसदेत घटनादुरुस्ती करुन राज्यांना ओबीसीसंबंधी यादी तयार करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे अनेकांचा असा समज झाला की केंद्राने महत्त्वाचे पाऊल टाकले मात्र ही केंद्राने शुद्ध फसवणूक केली आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!