नागपूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये त्यांनी आज दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्यावर टीका केली असून सत्ता गेल्यानंतर ते इतके अस्वस्थ झाल्याचे पाहून आश्चर्य वाटते, असा टोला शरद पवारांनी यावेळी लगावला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये दंगलीच्या विषयावरून फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टिकेबद्दल विचारले असता पवार यांनी त्यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. महाविकास आघाडीने मतांच्या ध्रुवीकरणासाठी या दंगली भडकविल्या असा आरोप भाजपने केला होता. यावरुन शरद पवारांनी भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील बोलले ते काही फार मनावर घेण्यासारखे काही नाही. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचे मला आश्चर्य वाटते. संवेदनशील विषयांवर बोलताना जबाबदारीने बोलण्याची गरज असते. माझा या पूर्वी समज होता की, ते गांभीर्याने मते व्यक्त करतात. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांतील त्यांची मते ऐकली. ती अतिशय उथळपणाची होती. कोणत्याही संवेदनशील प्रश्नावर बोलताना निवडणुकीतील मुद्दे लक्षात घेऊन बोलण्याचे टाळावे लागते. मला माहिती आहे की सत्ता गेल्यानंतर माणसे अस्वस्थ होतात. मात्र ती अस्वस्थता इतक्याही टोकाला जाऊ नये की त्यातून वास्तवतेचे भान सुटावं, असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरारी गुन्हेगार घोषित
- विदर्भातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या; शरद पवारांचा फडणवीसांना टोला
- ‘एखाद्या नाचीनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं’
- मलाना क्रीम घेऊन बोलल्याने बापूंचे विचार संपणार नाहीत- नवाब मलिक
- राज्याने कर कपात करून जनतेला दिलासा द्यावा; नाना पटोलेंचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

