Share

‘खडसे ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी चांगले काम करावे यासाठी त्यांना शुभेच्छा’

Published On: 

मुंबई- माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. गेली काही वर्ष पक्षातलं महत्व कमी झाल्यानं नाराज असलेले खडसे पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या बातम्या होत्या. अखेर काल भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसेंनी आपली भूमिका मांडली. गेली 40 वर्ष मी भाजपाचं काम केलं. पक्षानंही मला बरंच काही दिलं. पक्षाच्या नेत्यांवर वा पक्षावर जराही राग नाही. उलट भाजपा सोडताना खंत आहे. मला देवेंद्र फडणवीसांनी छळलं. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

पाटील म्हणाले की, खडसे यांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे. खडसे यांनी पक्षात राहावे अशीच आम्हा सर्वांची भूमिका होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कितीही रागावले तरी ते पक्ष सोडतील असे वाटत नव्हते. त्यांच्या नाराजीच्या मुद्द्यांवर काही ना काही मार्ग निघेल असे वाटत होते. आज सकाळीही मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. ते ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी चांगले काम करावे यासाठी त्यांना शुभेच्छा.

खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्याबाबत मी काही बोलणार नाही , असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!