मुंबई: सध्या राज्यात निवडणुका आणि मतदानानंतर आलेल्या निकलामुळे राजकीय वर्तुळात चांगलंच उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. गोंदिया, भंडाऱ्यात भाजपचा दबदबा दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील नगरपालिका – नगरपंचायती तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळविल्या असून पुन्हा एकदा ‘भाजपाच नंबर वन’ हे सिद्ध झाले आहे, असं पाटील यावेळी म्हणाले आहेत. पक्षाचे संघटन मजबूत असल्याने हे यश मिळाले आहे, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, गेले २६ महिने भाजपा राज्यात सत्तेबाहेर आहे तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे. भाजपाच्या नेते – कार्यकर्त्यांची एकजूट आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले आहे. सत्ताधारी आघाडीमध्ये बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नाही. कोरोनाचा सामना करणे आणि राज्यात विकासकामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाईमध्ये गुंतले आहेत. जनता या प्रकाराला कंटाळली आहे. जनतेची नाराजी नगरपालिका – नगर पंचायतींच्या निकालात दिसली, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी जागवल्या वनमंत्री असतांनाच्या सुखद आठवणी..!
राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु?; वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती
पोम्भूर्णा नगर पंचायतीत भाजपने राखला गड; मात्र ‘याठिकाणी’ काँग्रेसचीच सत्ता..!
टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती! म्हणाली, “हा माझा…”
Bigg Boss 15 : देवोलीनाने अभिजीत बिचुकलेच्या कुटुंबीयांना केलं इग्नोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

