🕒 1 min read
पुणे : अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे काल भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.
भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.
त्यानंतर यावरून आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली आहे. दरम्यान, या वादावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेतून प्रतिक्रिया दिली आहे. ‘एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही,’ असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केल्याने तर्क-वितर्क लावले जात आहेत.
‘शिवसेना भवनासमोर जे झालं ते क्लेशदायक आहे. एका खुर्चीपायी हे होणं हे क्लेशदायक आहे, असं सांगतानाच तुम्ही रोज सामानातून वाट्टेल ते लिहिणार, जे लिहिता त्याला आधारही नसतो. त्यावर निदर्शने करायची नाही का? रोषही व्यक्त करायचा नाही का?’ असा सवाल करतानाच ही दंडुकेशाही चालणार नाही, असं चंद्राकांत पाटील म्हणाले आहेत.
पुढं ते म्हणाले, ‘काल झालेला राडा हा मुंबई महापालिकेची तयारी वैगरे नव्हती, तो भावनिक प्रश्न होता. तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून अंतर निर्माण झालं. तुम्ही हिंदुत्व सोडणार आणि आमच्या हिंदुत्वावर टीका करणार तर कसं सहन होईल? ही लोकशाही आहे. त्यामुळे तुमची दंडुकेशाही नाही चालणार. आंदोलकांच्या हातात दगड, गोटे नव्हते. जे काही असेल ते सीसीटीव्हीत येईलच, असं सांगतानाच 15 दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजप कार्यालयासमोर आंदोलने केली. त्याआधी काँग्रेसनेही आंदोलने केली. तेव्हा आम्ही अडवलं नाही. पोलीस आले. आंदोलकांना आंदोलन करण्यासाठी थोडा वेळ दिला आणि त्यांना घेऊन गेले.’
महत्वाच्या बातम्या
- शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..
- ‘अशोक चव्हाणांनी जनहिताचे कामे करावीत’, खा.चिखलीकरांचा टोला
- ‘झारीतील शुक्राचार्य नेमके कोण? मराठा समाजाच्या मागण्या का मान्य होत नाहीत?’
- गाझियाबाद प्रकरणाविषयी ट्विट करत जावेद अख्तरांनी व्यक्त केला संताप
- खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा – शंभूराज देसाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
