Share

खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा – शंभूराज देसाई

Published On: 

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. पेरण्या पूर्ण झाल्यानंतर रासायनिक खतांची मागणी वाढेल. रासायनिक खतांची विक्री शासनाने ठरवून दरानेच होणे आवश्यक आहे. जादा दराने रासायनिक खतांची विक्री होत असल्यास संबंधित कृषि सेवा केंद्रावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कृषि विभागाला दिले. खरीप हंगाम, कोरोना सद्यस्थिती यासह इतर विषयांचा आढावा घेण्यासाठी आज, १६ जून रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित सभेत ते बोलत होते.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये पुरेशा प्रमाणात व वेळेवर बियाणे, खते उपलब्ध करून देण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या आहेत. आगामी काळात रासायनिक खतांची मागणी वाढणार असल्याने खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. बियाणे, खते मिळाले नाहीत, अशी कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. रासायनिक खतांची जादा दराने विक्री होवू नये, यासाठी तालुकास्तरीय भरारी पथकांना नियमितपणे कृषि सेवा केंद्रांची तपासणी करावी. तसेच बियाणे, खतांच्या अनुषंगाने कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्याअनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी.

पिक कर्ज वितरणात राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, काही बँकांकडून पिक कर्ज वितरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. त्यामुळे कमी प्रमाणात पिक कर्ज वाटप केलेल्या राष्ट्रीयकृत बँकेतील शासकीय ठेवी काढून जास्त प्रमाणात पिक कर्ज वितरण करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!