कोल्हापूर : केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘आजही मोदींना अजून बरंच काम करायचं बाकी आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर अविश्वास नाही, पण आजही आपला देश नेहरुंच्याच पुण्याईवर चालला आहे,’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोहापुरात माध्यमांशी बोलताना संजय राऊतांवर पलटवार केला आहे. ‘संजय राऊत यांनी एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर चिंतन करायला पाहिजे. त्यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेबांना हा प्रश्न विचारावा. मग बाळासाहेब ठाकरेही वरुन संजय राऊतांच्या थोबाडीत मारतील,’ अशी टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
संजय राऊतांचा मोदी सरकारला चिमटा !
‘सरकारने राहुल गांधी यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकले पाहिजे. कोरोनामध्येच सरकारची दोन वर्षे तर निघून गेली. देशासाठी अजून बरच काही करणे बाकी आहे. गेल्या ६० वर्षातील पंडित नेहरु ते राजीव गांधी, नरसिंह राव यांच्यापर्यंतचा जो लेखाजोखा आहे त्याच्या पुण्याईवर देश चालत आहे. नवीन काही झालेले नाही पण आपण अपेक्षा करु शकतो,’ असं संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- सरसकट महाराष्ट्राला शिथिलता मिळणार की निर्बंध कायम राहणार ? मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद
- देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा ; नाना पटोलेंचा घणाघात
- काँग्रेस सरकारच्या पुण्याईवरच देशाचा कारभार सुरु : संजय राऊत
- श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात बाद झाल्यावर केलेल्या ‘या’ चुकीमुळे तमिम इक्बालने ठोठावला दंड
- ‘औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांत पाटलांना अजित पवार दिसतायत’


