पुणे : भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्ष हा अधिक तीव्र झाला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील हे आमने-सामने आले आहेत.
‘हे सरकार महाविकास आघाडीचे सरकार राज्य झोपेत असताना पडेल,’ असं चंद्रकांत पाटील हे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावर बोलताना बहुतेक पाटील झोपेतच हे बोलले असतील, असा चिमटा अजित पवार यांनी काढला होता. यानंतर चंद्रकांत पाटील यांचा पारा चांगलाच तापलेला दिसून आलं. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर आक्रमक प्रहार केल्यानंतर राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.
‘औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात,’ असा टोला मिटकरींनी लगावला आहे. तर, ‘चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पाण्याविना मासे तडफडतात तशी राज्यातील भाजप नेत्यांची अवस्था आहे. मात्र, त्यांनी उगाच सत्तेची स्वप्न पाहू नयेत. राज्यात पुढील 15 वर्षे महाविकासआघाडीची सत्ता असेल,’ असा दावा देखील अमोल मिटकरी यांनी केला आहे. यामुळे हा वाद आता चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.
अजितदादा…आम्ही फाटके, बोलायला लागलो तर खूप महागात पडेल – चंद्रकांत पाटील
‘शरद पवार झोपेतून उठायच्या आधी शपथ घेऊन तुम्ही मोकळे झाला होता. तुम्ही आमच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी झाला. शपथही घेतली, पण २८ आमदार सुद्धा तुम्हाला सोबत ठेवता आले नाहीत. सरकार कोणतंही आलं तरी हेच उपमुख्यमंत्री असतात. तत्व नाही, व्यवहार नाही, कशाशी कशाला सांगड नाही. फक्त ज्याचं सरकार त्याच्यासोबत मी जाणार. अजितदादा, यापुढे आमच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला. आम्ही फाटके आहोत, आम्ही बोलायला लागलो तर फार अवघड जाईल,’ असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेस सरकारच्या पुण्याईवरच देशाचा कारभार सुरु : संजय राऊत
- ट्रोलर्सना कसं देतोस उत्तर? ; कोहलीने शेअर केला हटके फोटो
- शालूच्या फोटोवर कमेंट्सची गर्दी ; पहा घायाळ करणारा अंदाज
- आयपीएलची घोषणा केली, मात्र टी-२० विश्वचषकासाठी मागितला एक महिन्याचा अवधी; खरे कारण आले समोर
- माही आणि चिकूचं नातं दोन शब्दात सांग ; विराटला चाहत्याचा प्रश्न , दिलं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

