नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरातील शास्त्रज्ञांनी नुकताच कोरोना व्हायरसबाबत इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, ‘NeoCov’ नावाच्या आणखी एका कोरोनाव्हायरसने जगात दस्तक दिली आहे. हा नवीन कोरोनाव्हायरस अत्यंत संसर्गजन्य आहे आणि यामध्ये ३ पैकी १ संक्रमित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. हा नवीन कोरोनाव्हायरस दक्षिण आफ्रिकेत सापडल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. रशियाची वृत्तसंस्था स्पुतनिकच्या मते, कोरोनाव्हायरसचा हा नवीन प्रकार खूपच जास्त संसर्गजन्य आहे आणि त्याचा मृत्यू दरही खूप जास्त आहे.
माहितीनुसार NeoCov विषाणू नवीन नाही. २०१२ आणि २०१५ मध्ये पश्चिम आशियातील देशांमध्ये त्याचा प्रादुर्भाव पहिल्यांदा आढळून आला. हे SARS-CoV-2 सारखेच आहे यामुळे मानवांमध्ये कोरोनाव्हायरस संसर्ग होतो. दक्षिण आफ्रिकेत हा NeoCoV विषाणू वटवाघुळांमध्ये दिसला आहे आणि तो आतापर्यंत फक्त प्राण्यांमध्ये आढळला आहे.
BioRxiv वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की NeoCoV आणि त्याचे भागीदार PDF-2180-CoV मानवांना संक्रमित करू शकतात. वुहान युनिव्हर्सिटी आणि चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेसच्या संशोधकांच्या मते, या नवीन कोरोनाव्हायरसला मानवी पेशींना संक्रमित करण्यासाठी फक्त एका उत्परिवर्तनाची आवश्यकता असते. या नवीन विषाणूमुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असेही अभ्यासात म्हटले आहे.
रशियाच्या विषाणूशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान विभागाने NeoCoV बद्दल दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या हा नवीन कोरोनाव्हायरस मानवांमध्ये सक्रियपणे पसरण्यास सक्षम नाही. सध्या हा वेळ नवीन विषाणू लोकांमध्ये पसरतो की नाही हे जाणून घेण्याचा नाही तर त्याची क्षमता आणि धोका तपासण्याचा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- संविधानाची पायमल्ली करीत हुकूमशाही ‘मविआ’ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही चपराक- गिरीश महाजन
- माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मृतदेह बंगळुरूमध्ये आढळला, आत्महत्येचा संशय
- FIFA WC 2022 : वर्ल्डकप पात्रता फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाचा चिलीवर विजय
- अजिंठ्याची निसर्गसंपन्नता, वैभव पाहून आदित्य ठाकरेंनाही आवरला नाही मोह; कॅमेऱ्यात टिपली क्षणचित्रे!
- कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर यावर काय निर्णय घ्यायचा हे ठरवू- अनिल परब


