मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष भाजपकडून ठाकरे सरकार चालणार नाही, असं वारंवार बोललं जात होत. भाजपच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीने प्रत्येक वेळी भाजपला उत्तर दिल्याचंही पाहायला मिळालं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेवरुन आता पुन्हा सेना-भाजपचा वाद सुरु झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कानाखाली मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, असं ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने मला सांगितलं होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एक मंत्री कोण? असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. आणि कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाहीत. चंद्रकांत पाटील किंवा अन्य कुणी अशा अफवा पसरवित असतात. त्यांना आनंद मिळतो. त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. पण महाविकास आघाडीचं सरकार तीन वर्षे चालेल. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. त्याबाबत त्यांनी निश्चित राहावं, असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तीन आयपीएल संघांना मोठा धक्का; बड्या खेळाडूंची माघार
- आता कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्याव्याच लागतील; सदावर्ते यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- ‘शिवसेनेतील नेत्यांकडूनच मुख्यमंत्री ठाकरेंची दिशाभूल’, मुनगंटीवार यांची टीका
- खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
- ओबीसी समाजाला धक्का : राज्य सरकारला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

