Share

‘महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळेच…’; चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंचे आरोप फेटाळले

Published On: 

मुंबई: लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण करत आहेत. यावेळी बोलताना देशात कोरोना विषाणू पासरवण्यासाठी कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप देखील मोदींनी लावला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्रातील मजुरांना काँग्रेसने (Congress) स्थलांतर करण्यास भाग पाडले. त्यासाठी त्यांना मोफत तिकिटे दिली, असा आरोप मोदींनी केला. या त्यांच्या भाषणानंतर महाराष्ट्रातील भाजप विरोधी नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या महाराष्ट्राने भाजप युतीसोबत केंद्राला १८ खासदार दिले, त्यांच्या मागे महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्या सर्वांचा नरेंद्र मोदींनी मोठा अपमान केला आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच त्यांनी महाराष्ट्राला कितीही बदनाम करण्याचे ठरविले तरी महाराष्ट्र दिल्लीसामोर झुकणार नाही असेही त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या टीकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात परप्रांतातून आलेल्या लोकांना आम्ही तुमची काळजी घेऊ, असा आत्मविश्वासदेखील हे महाविकास आघाडी सरकार देऊ शकलं नाही, हेच त्यांचं अपयश आहे. मोदीजींनी देशभरातील लोकांना सर्व सुविधा दिल्या, मात्र तुम्ही काय दिलं ?, असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळेच ट्रेन सोडण्यात आल्या होत्या, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!