Share

संजय राऊत फार मोठे विद्वान, ते काहीही बोलू शकतात – चंद्रकांत पाटील

Published On: 

पुणे : राज्य सरकारने एकूण १२ नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. दरम्यान, काल आमदारांच्या नियुक्तीच्या वादावरुन मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सचिवांना प्रश्न विचारलाय. ‘राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या १२ सदस्यांबाबत निर्णय कधी घेणार आहात?’ अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाकडून करण्यात आली आहे.

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप घेतलाय. उच्च न्यायालयाने विचारला तसाच आम्हीही प्रश्न विचारतो आहे, असं म्हणत त्यांनी नियुक्त्यांबाबत थेट राज्यपालांना जाब विचारला आहे.

संजय राऊत यांच्या या विधानाबाबत आता भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करत टोला लगावला आहे. ‘संजय राऊत काहीही बोलू शकतात, ते फारच मोठे विद्वान आहेत. हे प्रकरण कोर्टात आहे. त्यावर मी बोलू शकणार नाही,’ असं पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

‘राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्त न करणं हा घटनेचा भंग आहे. तुम्ही आमचा अपमान करत आहात’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे. तर, ‘उच्च न्यायालयाने विचारला तसाच आम्हीही प्रश्न विचारतो आहे. विचारणारे कोण आहेत? लोकनिर्वाचित सरकार, मुख्यमंत्री विचारत आहेत. राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्ती न करणं हा घटनेचा भंग आहे. घटनेनं त्यांना अधिकार दिला आहे. एक वर्ष होऊनही आपले राज्यपाल महोदय त्या फाईलकडे ढुंकून पाहायला तयार नाहीत. हे १२ सदस्य साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आहेत. तुम्ही आमचा अपमान करत आहात’, असे राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!