🕒 1 min read
मुंबई:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यावर महाराष्ट्राच चित्र कसं असेल, हे या निवडणुकीत दिसून आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेकांवर अन्याय केला, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
भाजपाच्या काही नेत्यांना स्वप्नं पडतात की ऑपरेशन लोटस करु, महाविकास आघाडीच्या आमदारांना अमिषं दाखवून राजीनामा द्यायला लावायचे आणि सरकारला धोका निर्माण करायचा, असं भाजपाच्या नेत्यांना वाटतं, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जरी राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवायची ठरवले, तरी महाविकास आघाडी त्यांना पराभूत करेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पकडे झुकलेल्या मतदारांचा त्या पक्षाकडून भ्रमनिरास होत असल्याचे चित्र आहे : आप
- पेपरवर लिहून देतो, राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही – हसन मुश्रीफ
- ‘जुग जुग जियो’च्या शुटिंगदरम्यान अनिल कपूर, वरुण धवन, नीतू सिंह यांना कोरोनाची लागण
- ‘…पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षांनीच रचला मृत्यूचा सापळा’
- ‘फडणवीस आणि चंद्रकांतदादा म्हणत असतील, काश ईव्हीएम होता तो अच्छा होता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
