मुंबई: मालाडयेथील क्रीडा उद्यानाला टिपू सुलतान नाव दिल्याप्रकरणी राज्यात चांगला वाद रंगला आहे. त्यातच राज्यसरकरने वाईनसंदर्भातही मोठा निर्णय घेतला आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला चांगलेच घेरले आहे. आता यावरूनच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Opposition Leader Praveen Darekar) यांनी शिवसेनेला निशाण्यावर धरले आहे.
“प्रज्ञा ठाकूर यांचे ऐकणाऱ्यांनी त्यांचे हिंदुत्ववादी विचार ही जोपासले पाहिजेत. टिपू सुलतान संदर्भात केवळ सत्ता टिकवण्यासाठी, काँग्रेसचे तसेच विशिष्ट जाती-धर्माचे लांगूलचालन करण्यासाठी शिवसेना भूमिका घेत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका प्रखर केली. आज त्यांचे सुपुत्र सत्तेत असताना ज्याने हिंदूंना विरोध केला अशा टिपू सुलतानबाबत भूमिका घेत नाहीत. ज्या टिपू सुलतानने मराठा साम्राज्य संपण्याचे काम केले. ज्यांनी मराठा साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला अशा टिपू सुलतानवर प्रेम कशासाठी? असा सवाल करत सत्ता शिवसेनेसाठी मोठी झाली असून आचार-विचार मागे पडले आहेत. असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
प्रज्ञा ठाकूर यांचे ऐकणाऱ्यांनी त्यांचे हिंदुत्ववादी विचार ही जोपासले पाहिजेत. टिपू सुलतान संदर्भात केवळ सत्ता टिकवण्यासाठी, काँग्रेसचे तसेच विशिष्ट जाती-धर्माचे लांगूलचालन करण्यासाठी शिवसेना भूमिका घेत नाही. ज्यांनी मराठा साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला (1/2) pic.twitter.com/23pDKtnLEG
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 29, 2022
दरम्यान यावेळी त्यांनी जरी आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून बाहेर झालो असलो तरी आमचं त्यांना समर्थन काल होत, आज आहे आणि उद्याही असेल. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे जर विलीनीकरण करता येत नसेल तर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे त्यांना वेतन द्यावे, असा एक मध्यमार्ग काढून सामोपचाराने एसटीच्या समन्वयकांशी बोलून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न सोडवला पाहिजे. असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “भाजपमधून बरेच लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार”; नवाब मलिकांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
- सुपरमार्केटमधून दारु विक्री करण्याऐवजी मविआने प्राथमिक सुविधांकडे लक्ष द्यावे- देवेंद्र फडणवीस
- दक्षिण आफ्रिकेच्या “बेबी एबी”ची आयपीएलमध्ये “या” संघाकडून खेळण्याची इच्छा!
- “काम बोलता है भाई, काम बोलता है”, जितेंद्र आव्हाडांनी केले आदित्य ठाकरेंचे कौतुक
- ‘चौकीदाराकडूनच हेरगिरी’; Pegasus प्रकरणी राहुल गांधीचा केंद्रावर हल्लाबोल


