नाशिक – येणाऱ्या २ ते ३ दिवसात महाराष्ट्रासह अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. काल राज्यात अनेक ठिकांणी ढगाळ वातावरण होते. काल संध्याकाळी निफाड परिसरात वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.
फक्त 20 मिनिटे पडलेल्या पावसाने परिसरातील लोकांना चांगला गारवा जाणवला तर उकाड्यापासून सुटका झाली. अचानक झालेल्या पावसामुळे अनेक पीकांवर त्याचा परिणाम होणार आहे. काढणीला आलेल्या पीकांवर पाऊस झाल्याने काही पिकांचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.
काल दिवसभर नाशिक जिल्ह्यात आभाळ दाटून आले होते. उकाडा निर्माण झाला होता. रात्री २० मि. पडलेल्या पावसाने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. शेतक-यांच्या पीकांना मोठा फटका बसला असेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. कांदा, गहू आणि द्राक्ष या पिकांना पावसाचा फटका व हवामान बदलाचा परिणाम पुन्हा पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने अलर्ट दिला होता त्यानुसार नाशिकमध्ये काल पाऊस झाला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

