परभणी : राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगरपालिकेतील काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रावादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधलं आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या 10 नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना मंत्री नवाब मलिकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे राजकारण संपल्याचं म्हंटलं होतं. त्यावरुन मलिकांनी फडणवीसांना चांगलंच सुनावलं आहे.
फडणवीस साहेब तुम्ही ज्या तालमीत शिकताय त्या तालमीचा उस्ताद या महाराष्ट्रात आहे. आणि देशातला तो उस्ताद म्हणजे आमचे शरद पवार आहेत. तुमचे नेते सांगतात राजकारणाचे चाणक्य आमच्या पक्षात आहेत. पण चाणक्यचा बाप आमच्या पक्षाचा नेता आहे. आम्ही महाराष्ट्रात कोणाला घाबरणार नाही, असं म्हणत नवाब मलिकांनी फडणवीसांना सुनावलं आहे.
आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही झोपतो पण आणि झोप उडवतो पण, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला. नव्यानं लोक या पक्षात येतात त्यामुळे या पक्षात कोणताही नवा जुना वाद होणार नाही, याची काळजी घ्या. परभणी हा पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने जिल्ह्यातील अनेक कामे केली. अनेक प्रश्न सोडवले आहेत, कोरोनामध्ये होम क्वारंटाईन असेल या कोविड बाबत अनेक कामे केली करण्यात आली. राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी भाजपची दडपशाही होती. अर्धे लोक तुरुंगात जातील असं ते म्हणतात मात्र आम्ही घाबरत नाही. आमच्या नेत्यांच्या मागं ईडी आणि सीबीआय लावली आहे, त्याचा सामना करु, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गेले दीड वर्ष मंत्रालयात पाऊल न ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनाही वेतन आणि भत्ते मिळता कामा नये’
- …हा सगळा ड्रग्ज रॅकेटचा खेळ गुजरातमधून चालतोय का?- नवाब मलिक
- जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर
- काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांनी घेतली आमदारकीची शपथ
- ठाकरे सरकारचा निर्णय, मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

