कोल्हापूर: महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा नववा दिवस आहे तरीदेखील महाविकास आघाडी सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून येणाऱ्या चार फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. तर लोकप्रतिनिधींना सार्वजनिक कामात सहभागी होऊ देणार नाही, असा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“सापाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्ष दुध पाजलं पण…”, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
-
“समीर वानखेडे हे भाजपचे दत्तक पुत्र”, संजय राऊतांचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
