Share

“त्याने ७०% जरी कामगिरी केली तरी टीम मॅनेजमेंटचा कल त्याच्याकडे असेल” संजय बांगरांचा खेळाडूवर विश्वास

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : श्रीलंकेवर ३-० ने मालिका जिंकून भारताच्या घरच्या मैदानावर तिसरी मालिका जिंकली आहे. हा विजय न्यूझीलँड आणि वेस्ट इंडिजवर एकामागोमाग विजय मिळविल्यानंतर झाला. श्रीलंका विरुद्ध मालिकेत अनेक युवा खेळाडूंना प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली आहे. मात्र यामुळे आता कोणा कोणाला संघात संधी द्यावी असा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे उभा राहिला आहे. दरम्यान, भारताच्या माजी फलंदाजी प्रशिक्षकाने किशनबद्दल आपले मत अगदी स्पष्टपणे मांडले. ६० ते ७० टक्के कामगिरी करूनही भारतीय संघात किशन निवडला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले आहे.

ईशान किशन (ishan kishan) बद्दल बोलताना संजय बांगर (sanjay banger) म्हणाले “वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील मालिकेत त्याने फारशी चांगली कामगिरी केली नाही. पण इथे त्याने ८५धावांची खेळी करताना ज्या प्रकारे कामगीरी केली, ते अविश्वसनीय होते. त्या डावात त्याची ताकद पूर्ण प्रदर्शनात होती, विशेषत: शॉर्ट बॉलवर. एकदा त्याला त्याची लय सापडली की तो थांबू शकत नाही. तो त्या स्ट्राइक रेटने खेळतो ज्याची भारताला टॉप ऑर्डरवर गरज आहे. त्यामुळे, जरी त्याने त्याच्या क्षमतेच्या ६० ते ७० टक्के कामगिरी केली, तरी मला विश्वास आहे की संघ व्यवस्थापनाचा या क्षणी त्याच्याकडे कल आहे.”

शेवटच्या टी २० सामन्यात लाहिरू कुमाराच्या (lahiru kumara) एका वाईट बाउन्सरने ईशान किशनच्या डोक्याला मार लागला, त्यानंतर सामन्यादरम्यान रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. भारताच्या डावाचे ते चौथे ओव्हर होते जिथे ते १८४ धावांचे मोठे लक्ष्य पाठलाग करत होते, वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा एक ज्वलंत स्पेल टाकत होता आणि त्याचा १४६ किमी प्रति तासाचा बाउन्सर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असलेल्या किशनच्या हेल्मेटवर आदळला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!