Share

“सापाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्ष दुध पाजलं पण…”, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Published On: 

मुंबई: आजपासून (३ मार्च) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तत्पूर्वी भाजप आणि मविआ सरकारने पत्रकार परिषद घेत एकमेकांवर निशाणा साधला. नवाब मलिक यांनी दाऊदशी केलेल्या व्यवहारामुळे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्रमक भूमिका घेत राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनीही बैठक घेतली. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, “सापाच्या पिलाला आम्ही ३० वर्षे दूध पाजले, ते पिल्लू वळवळ करत होतं आता आमच्यावरच फुत्कारत आहे. सध्या देशात एक विकृती आहे, एक घृणास्पद राजकारण सुरू असून विकृतीपेक्षा घाणेरडेपणा सुरु आहे.”

तसेच हिंमत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाहीत? तिकडे पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग दाऊदच्या मुसक्या का आळवत नाहीत? आज इकडे धाड पाडतायेत तिकडे धाड पाडतायेत, याला अटक करतायेत, त्याला अटक करतायेत. मात्र, आता हे खपवून घेणार नाही. असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत. मात्र आम्ही नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच. पण आम्हाला चर्चेत रस असून आम्ही अनेक मुद्दे मांडणार आणि चर्चा सुद्धा करणार. असे फडणवीस यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!