पुणे : पुणे मनसेला काही दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका, रणरागिणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीमध्ये स्थिरावण्याचा मोठा निर्णय रुपाली पाटील यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे मनसेला पुण्यात मोठा धक्का बसला असून मनसेमधील एक महिला कणखर नेतृत्वाची कुठेतरी कमी जाणवणार असल्याचे बोलले जाते.
रुपाली पाटील ठोंबरे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. रुपाली पाटील यांना मनसे सोडल्याने काही मनसैनिकांनी टीका केली तर काहींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांचे पक्षात मोठ्या आनंदाने स्वागत केले. पण राष्ट्रवादी मधील एक चेहरा नाराज असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या मात्र रुपाली पाटील यांच्या राष्ट्रवादीत येण्याने नाराज असल्याचे दिसून येत आहे. रुपाली चाकणकर यांनी रुपाली पाटील यांचे स्वागत केले नाही की त्यांना शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. सोशल मीडियावर रुपाली पाटील यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत असताना रुपाली चाकणकरांनी मात्र त्यांंना कुठल्याही शुभेच्छा दिसत नाही. रुपाली चाकणकरांनी रुपाली पाटलांच्या स्वागताची कोणतीही सोशल मीडियावर पोस्ट केलेली नाही. यावरून आता राष्ट्रवादीमध्ये रुपाली विरुद्ध रुपाली असा सामना पाहायला मिळणार का? रुपाली पाटील यांचा मनसेमध्ये होता तसाच खळखट्याक आता राष्ट्रवादीध्येही पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही’
- ‘महाराजांचा अवमान तर सोडाच, अनादरही खपवून घेतला जाणार नाही’
- कदम कोणत्याही पक्षात गेले तरीही त्यांची किंमत शून्यच; निलेश राणेंची जहरी टीका
- ‘शिवसेनेत गद्दार दुसरं तिसरं कोणी नसून फक्त रामदास कदमच महागद्दार’
- रामदास कदमांच्या टीकेवर अनिल परबांची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

