🕒 1 min read
श्रीलंका : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा हा सुरुवातीपासुनच अडचणीत सापडत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताविरुद्ध मालिकेसाठी नवा संघ उभा करण्यात आला. यादरम्यान श्रीलंकेच्या नव्या संघातही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर ही मालिका ५ दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे निर्धारित कार्यक्रमानुसार ही मालिका १३ ऐवजी १८ जुलैपासून सुरु होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय मालिकेच्या सुधारित वेळापत्रकानंतर श्रीलंका क्रिकेटने दोन्ही संघात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या नवीन वेळा देखील शेअर केल्या आहेत.
Fun guaranteed when "Kul-Cha" are in one frame ???? ????
Who is excited to watch this duo in action in the #SLvIND series? #TeamIndia ????????@imkuldeep18 | @yuzi_chahal pic.twitter.com/pkpRPn9JfV
— BCCI (@BCCI) July 15, 2021
या सामन्यापूर्वी थोडं रिलॅक्स होण्याकरता भारतीय खेळाडू मजा मस्ती करत आहेत. बीसीसीआयने फिरकीपटू कुलदीप यादव (आणि युजवेंद्र चहल यांचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते दोघेजण डमशराज खेळताना दिसत आहेत. यादरम्यान कुलदीप एमएस धोनी, विराट कोहली, रिषभ पंत आणि इशांत शर्मा यांच्या खेळण्याच्या शैलीची नक्कल करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहते देखील भरभरून कमेंट करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पंत पाठोपाठ ‘या’ महत्वाच्या खेळाडूलाही कोरोनाची लागण
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- ‘मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल’ ; भाजपचा विश्वास
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
