Share

सहा कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने छगन भुजबळ होम क्वारंटाईन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर, छगन भुजबळ स्वतः होम क्वारंटाइन झाले असून पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले आहे.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी,असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले होते. ताप आणि अंगदुखीची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी गुरुवारी स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याचा काल पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १० लाखांच्या उंबरठ्यावर आहे. या कोरोनाच्या विळख्यातून कोणीही सुटलेले नाही. राज्यातील अनेक मंत्र्यांना, त्याचप्रमाणे त्याच्या संपर्कातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे, निश्चितच हे चिंताजनक आहे. नुकतेच शुक्रवारी राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले. विश्वजित कदम हे सध्या त्यांच्या पुण्यातील घरात क्वारंटाइन झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!