Share

वर्ध्यातील महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी खासदारांचा पुढाकार, बघा काय मिळणार सोयी

Published On: 

वर्धा : महिलांविरोधात हिंसा रोखण्यासाठी व अडचणीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी एकाच ठिकाणी विविध सुविधा पुरविता याव्या यासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ ची स्थापना करण्यात अली आहे. यामध्ये महिलांना पोलिसांच्या माध्यमातून मदत मिळणे, प्रथमोपचार मिळणे, आरोग्य सुविधा, मानसोपचाराचा सल्ला देणे, कायदेविषयक सल्ला देणे, या सोबतच आवश्यक वेळी तात्पुरत्या स्वरूपात तसेच पाच दिवसांपर्यंत महिलांना आर्शय देणे इत्यादी महत्त्वाच्या सुविधा एका छताखाली भारत सरकारच्या केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाच्या प्रचलित पध्दतीनुसार प्राप्त होणार आहे. सरकारने ठरविलेल्या नुसार नवीन इमारत उभी राहणार आहे.

यासाठी केन्द्र सरकारने महिला व बालकल्याण विभागाकडे रु. ४८ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून जागेअभावी काम प्रलंबित आहे, जागेचा सुध्दा प्रश्न लवकरचमार्गी लागेल व सुसज्ज अशी सखी वन स्टॉप सेंटरची ईमारत उभी राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले. खासदार रामदास तडस यांनी सामान्य रुग्णालय, वर्धा येथील सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी एस. एम. मेसरे, जिल्हा संरक्षण अधिकारी सुनील माहुरे, केन्द्र प्रशासक रेश्मा रघटाटे, समुपदेशक कविता काळसर्पे, पोलिस अधिकारी मिलिंद रामटेके, विधी अधिकारी पूजा फलके उपस्थित होते. यावेळी खासदार पुढे बोलताना म्हणाले की, सखी सेंटर अत्यंत कमी जागेत इमारत असुन सोईसुविधांचा अभाव आहे, हा अभाव दुर करुन पिडीत महिलांना सर्व सोईसुविधा देण्याकरिता मी पुढाकार घेणार असुन पोलीस चौकी, दुरध्वनी व्यवस्था, वाहनाची व्यवस्था करण्यासाठी लक्ष घालणार असल्याचे यावेळी म्हणाले. यावेळी केस वर्कर विशाखा दुपारे व लिना पुस्देकर, परिचारिका शुभांगी दुपारे व अश्विनी बाकरे, आयटी स्टाफ शेषराव राठोड, सिमा डंभारे, प्रभाकर साटोणे, राहूल चौधरी, हेमंत कावलकर, आशिष भरणे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!