Share

स्थिती नियंत्रणात न आल्यास नागपूर करावे टाळेबंद ?

Published On: 

नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालय व नागपूर महानगरपालिका कार्यालयाकडून ताबडतोब पर्यायी व्यवस्था काय आहे हे जनतेला सांगणे गरजेचे आहे. शहरातील सर्व सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन यावर तोडगा काढण्याची गरज आहे. शहरातील परिस्थिती भयानक असताना सामाजिक संस्थांचे योगदान यावेळी महत्वाचे ठरणार आहे. अश्या परिस्थितीत शहरात १0 दिवसांचा लॉकडाऊन घोषित का केला जात नाही? याबाबत सरकारने दखल घेतली नाही तर जय जवान जय किसान संघटनेला जनतेसाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व बैठका व नागरिकांच्या भेटी रद्द केल्या असून मनपामध्ये कुणालाच भेटता येणार नाही, असे कळविले आहे.

मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बहिरवार हे हायरिक्स पॉझिटिव्ह असल्यामुळे सर्व भेटी बंद झाल्याचे सांगितले आहे. कोरोना महामारीचा प्रकोप मोठय़ाप्रमाणात शहरात वाढला आहे. रोज दोन हजारांवर बाधित आढळत असून, मृत्यूसंख्या १,५00 च्या दारात येऊन पोहोचली आहे. सरासरी रोज ४0 ते ५0 मृत्यू दररोज होत आहे. अशा परिस्थितीत शहर १0 दिवस लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचे जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकातून सांगितले आहे.

कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे दवाखान्यामध्ये खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. असेच सुरू राहिले तर रुग्ण रस्त्यावर पडून मरतील, असे चित्र शहरात निर्माण होत आहे. नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचा संपूर्णपणे फज्जा उडाला असताना आयुक्तांनी सर्व भेटी बंद करणे अत्यंत असंवेदनशील आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हेसुद्धा विलगीकरणामध्ये आहेत. विभागीय आयुक्त संजीव कुमार कोरोना पॉझिटिव झाले. आणि महापौर संदीप जोशीसुद्धा होम आईसोलेट झाल्यामुळे नागपूर शहरासह जिल्ह्याचा कारभार वाऱ्यावर सुटला आहे.

संपूर्ण प्रशासन हतबल झाले आहे. असेच चालत राहिल्यास नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यामध्ये हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही. शासनाने याची दखल घेण्याची गरज आहे. मुंबईच्या धर्तीवर कोविड महामारीपासून रुग्णांचा बचाव करण्यासाठी वॉक इन रुग्ण व्यवस्था तयार करण्यात यावी. ज्या रुग्णाला त्रास होत आहे, त्यांना ताबडतोब आरोग्य सुविधा टेस्टिंग सेंटरजवळच करण्यात यावी.

लक्षण नसलेला करोना रुग्ण सापडल्यास त्याचे गृहविलगीकरण तर भीतीमुळे ऑक्सीजनची मात्रा कमी झाल्यामुळे अश्या रुग्णाला टेस्टिंग सेंटरवरील बेडवर त्याला आराम होईपर्यंत ठेवण्यात यावे. वेळप्रसंगी दवाखान्यात भर्ती करण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे उच्चस्तरीय कमेटीमध्ये ठरले आहे. त्यामुळे डे केअर, ओपीडी व रुग्ण स्टॅबीलाईजेशनची त्वरीत व्यवस्था करण्याची सूचना केली होती.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!