औरंगाबाद : अकरावी प्रवेशासाठी सीईटी प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा नियोजित होती. हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सीईटी रद्द करण्याचा निर्णय आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर बुधवारपासून विद्यार्थ्यांनी व पालकांनी महाविद्यालय प्रवेशासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विषयनिहाय केलेले गुणदान आणि मंडळाच्या धोरणानुसार देय असलेल्या सवलतीच्या गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देऊन मंडळाने त्याचे सर्व निकष विचारात घेऊन दहावीचा निकाल लावला. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
मात्र मंगळवारी हायकोर्टाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा रद्द केल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा गैरसमज दूर झाला आहे. त्यामुळे बुधवारी अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालये गाठत प्रक्रिया सुरुही केली. औरंगाबाद जिल्ह्यात अनुदानित महाविद्यालयातील प्रवेश क्षमता २८ हजार ८६० एवढी आहे. कला शाखेचे १२ हजार ८६०, वाणिज्य २ हजार ८००, विज्ञान १३ हजार २०० आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘स्पष्ट बोलता न आल्याने मित्र चिडवाचे’; शरद केळकरने सांगितला अनुभव
- ‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याइतपत राज्य सरकार बेपर्वा झालेय’, भाजपची टीका
- ‘विरोधकांनी देशाची माफी मागावी’, केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद
- तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता
- ‘…याची उत्तरे द्या अन्यथा राजीनामा द्या’, पडळकरांचे मंत्री वड्डेटीवारांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
