Share

निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा मतदारसंघात आधी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा होती ती वाढवून आता ९५ लाख रुपये करण्यात आली आहे. तर विधानसभा मतदारसंघात आधी २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा आता ४० लाख रुपये करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. आगामी निवडणुकीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी, भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठीची खर्चाची मर्यादा मोठ्या राज्यात ९५ लाख रुपये आणि छोट्या राज्यात ७५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तर विधानसभेसाठी ही मर्यादा मोठ्या राज्यात ४० लाख आणि छोट्या राज्यात २८ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

निवडणुकीत निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा घालून दिल्याने त्यापेक्षा जास्त खर्च केल्यास कारवाईची टांगती तलवार होती. त्यामुळे उमेदवारांना खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. आता या निर्णयामुळे उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!