मुंबई : 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या शौर्याबद्दल महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने 2020 मध्ये अजमल कसाबला धाडसाने पकडणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची आता लवकरच अंमलबजावणी होणार आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी अजमल कसाबसह इतर नऊ दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. यात आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर अजमल कसाब याला पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून जिवंत पकडलं होतं. या घटनेनंतर तब्बल 12 वर्षांनी म्हणजे 2020 साली कसाबला पकडणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व टीमला वन स्टेप प्रमोशन वेतन देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
वन स्टेप प्रमोशन वेतन म्हणजे हे पोलीस ज्या पदावर आहेत त्यांना त्यांच्या वरील पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना जेवढा पगार असेल तेवढा पगार मिळणार आहे. राज्य सरकारकडून 15 जणांना हे बक्षीस मिळणार आहे. यामध्ये कॉन्स्टेबल आणि पोलीस अधिकारी दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.या आदेशानुसार, कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात येणार आहे. लवकरच या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022 : दुष्काळात तेरावा महिना..! दारुण पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादच्या कॅप्टनला १२ लाखांचा दंड
IPL 2022: दारुण पराभवानंतर कर्णधार केन खेळाडूंवर संतापला; म्हणाला ‘या’ कारणामुळे झाला पराभव
IPL 2022: संजू- बटलरच्या खेळीने राजस्थानची विजयी सुरुवात; सामन्यात रचले अनेक रेकॉर्ड्स
मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस – सदाभाऊ खोत
“त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर…”, ‘त्या’ प्रस्तावावरून भातखळकरांचा शरद पवारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

