मुंबई : आयपीएल २०२२ च्या ५ व्या सामन्यात राजस्थान संघाला ६१ धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर वीरेंद्र सेहवागने केन विल्यमसनच्या टीमची मजेशीर पद्धतीने खिल्ली उडवली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकूनही केन विल्यमसनने क्षेत्ररक्षणाचा योग्य निर्णय घेतला होता. पण, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाने आपला निर्णय फिरवून चांगला खेळ केला. या मॅचनंतर वीरेंद्र सेहवागने त्यांची खिल्ली उडवली आहे.
राजस्थानने हैदराबादसमोर (SRH vs RR) विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण, केन विल्यमसनचा हैदराबाद १४९ धावा करू शकला आणि ६१ धावांनी विजयापासून दूर राहिला. यावेळी वीरेंद्र सेहवागने (Virendra sehwag) हैदराबाद संघाला ट्रोल करणारा एक मीम शेअर केला होता. यात मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील एका सीनचे मीम पोस्ट करत कॅप्शन लिहिले आहे, ‘भाऊ, हा आयपीएलमध्ये कसोटी सामना सुरू आहे.’
झालेल्या सामन्यात राजस्थानच्या संजू सॅमसनने २५ चेंडूत जबरदस्त अर्धशतक झळकावले. त्याच्या फलंदाजीने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. यादरम्यान संजूने ५ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने शानदार खेळी केली. त्यांच्याशिवाय जॉस बटलर, देवदत्त पडिकल आणि शिमरॉन हेटमायर यांनीही आपल्या दमदार खेळीने चाहत्यांची मने जिंकली. हैदराबादचा सामना हरला असला तरी मार्कराम आणि सुंदर यांनीही आपल्या खेळीने चाहत्यांना प्रभावित केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारात होणार वाढ!
- “विल स्मिथने एखाद्या विद्रोही शिवसैनिकाप्रमाणे…”, संजय राऊतांनी ‘त्या’ घटनेशी जोडले महाराष्ट्र कनेक्शन
- विल स्मिथच्या पत्नीला नेमका कोणता आजार आहे? ज्यावरून ऑस्करमध्ये झाला वाद
- IPL 2022 : दुष्काळात तेरावा महिना..! दारुण पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादच्या कॅप्टनला १२ लाखांचा दंड
- IPL 2022: दारुण पराभवानंतर कर्णधार केन खेळाडूंवर संतापला; म्हणाला ‘या’ कारणामुळे झाला पराभव


