औरंंगाबाद : मराठा समाजासह पाटीदार, आणि गुज्जर समाज आरक्षणासाठी केंद्र शासनाने नवीन कायदा तयार करावा अशी मागणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरूवारी (दि.२७) पत्रकार परिषदेत केली. तसेच त्यांनी यावेळी खा.संभाजीराजे यांनी आपल्या खासदारकीचा उपयोग करून केंद्रशासनावर आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षावर दबाव आणावा असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असून पुढे काय होणार अशी चिंता मराठा समाजातील प्रत्येकाला लागली आहे. मराठा समाजासह गुज्जर आणि पाटीदार समाज आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयीन लढा देत असून त्यांना अद्यापपर्यंत आरक्षण मिळालेले नाही. मराठा समाजासह गुज्जर आणि पाटीदार समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्रसरकारने आता पुढाकार घेण्याची गरज आहे.
केंद्रशासनाने ज्या प्रमाणे कलम ३७० रद्द केले, तसेच काही राज्यांना स्वतंत्रता बहाल केली त्याप्रमाणे मराठा समाजासह गुज्जर आणि पाटीदार समाजाला आरक्षण देण्यासाठी नवीन कायदा तयार करावा अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोठ्या दु:खातून मोठं बळ मिळतं…’ रिया चक्रवर्तीच्या पोस्टवर अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया
- ट्विटरला देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल – केंद्र सरकार
- “राज्यसरकार व प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या लपवत आहे, याचा भांडाफोड १ जूनला करणार”, आ. निलंगेकरांचा इशारा
- मोदींना अजून कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधीचा टोला
- ‘मिर्झापूर’ मधील अभिनेता राजेश तैलंगवर आर्थिक संकट?; ‘रामलड्डू’ विकतानाचा फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

