Share

केंद्राने मदत केली नाही,आता महाराष्ट्र सरकारवरच विश्वास : डेलकर कुटुंबीय

Published On: 

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी जीवनयात्रा संपवली होती. मरिन ड्राईव्ह परिसरातल्या ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये जीवनयात्रा संपवली होती. मात्र, त्यांनी जीवनयात्रा का संपवली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईत मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला.

मोहन डेलकर यांनी गुजराती भाषेत सुसाइड नोट लिहून जीवनयात्रा संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डेलकर हे लोकसभेतील दादरा आणि नगर हवेली मतदार संघातून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. मोहन डेलकर यांच्या पश्चात पत्नी कलाबेन डेलकर आणि दोन मुले अभिनव व दिविता असा परिवार आहे.

दरम्यान, आज मोहन डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने विधीमंडळात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेऊन सुरक्षेची मागणी केली आहे. आम्हाला केंद्र सरकारने मदत केली नाही. मात्र आता महाराष्ट्र सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा योग्य तपास होईल, अशी अपेक्षा मोहन डेलकर यांच्या पुत्राने व्यक्त केली. तसेच मोहन डेलकर यांना गेल्या १६ महिन्यांपासून त्रास देण्यात येत होता. या मानसिक त्रासामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही डेलकर कुटुंबीयांना केला.

तत्पूर्वी आज सभागृहात डेलकर आत्महत्ये प्रकरणावरून वादविवाद पाहायला मिळाले. खासदार मोहन डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे प्रफुल्ल खेडा पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळी जवळचे सहकारी होते, असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केला होचा. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ उडाला. भाजप नेत्यांनी देशमुख यांचे दावे फेटाळून लावत महाविकास आघाडी सुडाचे राजकारण करत असल्याचं म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!