Share

Eknath Shinde | CBI महाराष्ट्रात उघडपणे तपास करणार! एकनाथ शिंदे सरकार करणार ‘हा’ मोठा बदल

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ला महाविकास आघाडी सरकारने दिलेली ‘सामान्य संमती’ मागे घेण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे सरकार याबाबत निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. अशा प्रस्तावावर गृह विभाग काम करत असून, तो लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. महाविकास आघाडीने ऑक्टोबर 2020 मध्ये दिल्ली विशेष पोलीस आस्थापना कायदा, 1946 च्या कलम 6 अंतर्गत CBI ला सर्वसाधारण संमती दिली होती. केंद्र सरकार विरोधकांसाठी शस्त्रे म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे होते. त्यामुळे CBI ला तपासासाठी राज्य सरकारची परवाणगी आवश्यक होती.

महाराष्ट्राव्यतिरिक्त, पंजाब, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि मेघालय या आठ राज्यांनी 2015 पासून सीबीआयला दिलेली ही सर्वसाधारण संमती मागे घेतली आहे. या माघारीचा अर्थ असा आहे की केंद्रीय तपास संस्थेला एकतर राज्य सरकारची विशिष्ट परवानगी घ्यावी लागेल किंवा राज्यातील कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयात जावे लागेल.

मार्चमध्ये, राज्यसभेला माहिती देण्यात आली होती की, महाराष्ट्र सरकारच्या सहमतीमुळे 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बँकिंग फसवणुकीच्या 101 प्रकरणांमध्ये सीबीआय तपास सुरू करू शकली नाही.

सरकारपुढे अनेक प्रकरणे प्रलंबित –

बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील फसवणुकीशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सीबीआयकडून मंजुरी मिळविण्यासाठी राज्य सरकारकडे अनेक विनंत्या प्रलंबित आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. हिंदुस्तान टाईम्सच्या मते, जुलैमध्ये राज्यसभेत सादर केलेल्या डेटामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयने केलेल्या 91 विनंत्या गेल्या सहा महिन्यांत महाविकास आघाडी सरकारकडे प्रलंबित होत्या. सीबीआयच्या तपासासाठी संमती मागणाऱ्या 221 विनंत्या सहा राज्यांकडे प्रलंबित होत्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!