🕒 1 min read
Ajit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. आज देखील १२ वाजता देखील अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. आपण एखादा कायदा कोणावर अन्याय होऊ नये यासाठी तयार करतो, पण कायद्याचा आधार घेऊन निष्पाप व्यक्तीवर अन्याय होणं बरोबर नाही, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
अजित पवार म्हणाले, हे एक प्रकारचे षडयंत्र असून या प्रकरणात जसा वेळ जाईल त्याप्रमाणे यामागील सूत्रधार नेमका कोण याचा खुलासा होईल. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असे षडयंत्र रचून वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असेल तर यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावे, अशी आग्रही मागणी अजित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागील अनेक काळ सत्तेत असताना गृह खात हे राष्ट्रवादीकडे होते. मात्र त्या काळात या खात्याचा गैरवापर होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली. त्यावेळी या खात्याचा आदरयुक्त दरारा होता. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणात कोणताही विनयभंगाचा प्रकार नसताना त्यात गुन्हा दाखल करून एखाद्या लोकप्रतिनिधीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
आमदार म्हणून निवडून येताना पाच लाख लोकांचे प्रतीनिधित्व केले जाते. या काळात लोकांशी संपर्क ठेवणे, सर्वांना बरोबर घेऊन चालणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र आज या परंपरेला तिलांजली देण्याचे काम सुरू आहे, ते अतिशय घातक आहे. लोकांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता एकजूटीने या गोष्टीला सामोरे जाऊ. जिथे अन्याय होतो तिथे वाचा फोडण्याचे काम एकत्र मिळून करूया, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या विनयभंगा प्रकरणी एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Shivsena | धनुष्यबाण चिन्ह पुन्हा ठाकरे गटाला मिळणार?, आज होणार महत्वाची सुनावणी
- Shinde-Fadanvis | शिंदे-फडणवीस बैठकीत काहीतरी शिजलं! रात्री उशिरा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- Ajit Pawar | जितेंद्र आव्हाड राजीनामा देणार का?, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
- Shinde-Thackeray | ठाण्यात शिंदे-ठाकरे गट आमने सामने! राडा, धक्काबुकी अन् एक कार्यकर्ता जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
