Share

Ajit Pawar | जितेंद्र आव्हाड राजीनामा देणार का?, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच नेते मोठ्या प्रमाणात आक्मक झाले आहे. त्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. आव्हाड यांच्या राजीनामा बाबात राष्ट्रवादी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टपणे निर्णय सांगितला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी आव्हाडांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर अजित पवारांनी देखील भेट घेतली. यावेळी, जितेंद्र आव्हाड पवार साहेबांना दैवत मानतात, पवार साहेब शेवटचा निर्णय सांगतील, तोच निर्णय आव्हाड मान्य करतील, त्यांना तो पटो किंवा न पटो. साहेबांचा शब्द म्हणून ते मान्य करतील. हे मी त्यांच्या साक्षीने सांगतो. जितेंद्र आव्हाड यांनी ते ट्वीट मागे घ्यावं, असं अजित पवार म्हणाले.

विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असेल, तर ही लाजिरवाणी बाब आहे. खरंतर मुख्यमंत्र्यां समोर सगळं घडलं असून विनयभंग झालेला नाही, हे सांगायला पाहिजे होतं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

दरम्यान, आमच्याकडे सुरूवातीपासून गृहखातं होतं, पण कधीही असा गैरवापर केला नाही. लोकप्रतिनिधीला अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे. आम्ही सगळे जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष घातलं पाहिजे. कायद्याचा आधार घेऊन हे केलं जातंय. पोलीस दबावाखाली वागत आहेत, असं देखील पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!