🕒 1 min read
Shinde-Thackeray | मुंबई : किसन नगर परिसर येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आमने-सामने आले (Shinde-Thackeray). गटाकडून कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नव्या शाखेचं उद्घाटन करण्यात येत होतं. हा परिसर एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. कार्यक्रमा दरम्यान ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नव्या शाखेचं उद्घाटन करण्यात येत होतं. हा सगळा प्रकार कॅमेरमध्ये कैद झाला आहे.
यावेळी, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर यांच्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मारहाण केल्याचा आरोप आहे.
खासदार राजन विचारे शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्यांच्यासोबत किसन नगरमधील ठाकरे गटाच्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक कार्यक्रमस्थळी गेले. त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. या दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचं रुपांतर मारहाणीत झालं. शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :
- Sushama Andhare | “देवेंद्र फडणवीस सत्ता प्रेमाने…”, सुषमा अंधारे यांचा उपमुख्यमंत्र्यांवर घणाघात
- Eknath Shinde | जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले,
- Chandrashekhar Bawankule | “आगामी काळात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत”; बावनकुळेंची बोचरी टीका
- Chitra Wagh | “जितेंद्र आव्हाडांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही” ; चित्रा वाघ यांचा घणाघात
- Uddhav Thackeray । “धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर घेतला?”; ठाकरे गटाचा कोर्टात सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
