🕒 1 min read
Shivsena | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षावर तसेच धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज या प्रकरणी महत्वाची सुनावणी आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळणार की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना हे पाहणं महत्वाचं आहे.
निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला स्वतंत्र चिन्ह दिली होती. शिवाय धनुष्यबाण हे शिवसेनेनचं पक्षचिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नावही गोठवलं होतं. या विरोधात ठाकरे गटाने आवाज उठवला होता. पक्षाचं निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतलेली. त्यावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
पोटनिवडणूक लढण्यासाठी पक्षचिन्ह गोठवण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाने आपला उमेदवारच या निवडणुकीत दिला नाही. शिवाय आता पोटनिवडणूक संपली असून ताप्तुरता निर्णय आता पुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलीय.
सोमवारी ठाकरे गटाने आपला युक्तिवाद दिल्ली हायकोर्टात केला होता. यावेळी धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव या दोन्ही वापरण्यास पुन्हा परवानगी द्यावी, अशी अप्रत्यक्ष मागणी करण्यात आलीय.
महत्वाच्या बातम्या :
- Shinde-Fadanvis | शिंदे-फडणवीस बैठकीत काहीतरी शिजलं! रात्री उशिरा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- Ajit Pawar | जितेंद्र आव्हाड राजीनामा देणार का?, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
- Shinde-Thackeray | ठाण्यात शिंदे-ठाकरे गट आमने सामने! राडा, धक्काबुकी अन् एक कार्यकर्ता जखमी
- Sushama Andhare | “देवेंद्र फडणवीस सत्ता प्रेमाने…”, सुषमा अंधारे यांचा उपमुख्यमंत्र्यांवर घणाघात
- Eknath Shinde | जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले,
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
