🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) सुरू होताचं घरातील लहान मंडळीसह वडीलधारी लोकही आंघोळ (Bath) करायला कचकच करतात. कारण या कडकाच्या थंडीमध्ये लोकांना सकाळी लवकर आंघोळ करावीशी वाटत नाही. त्यामुळे अनेकजण या थंडीमध्ये आठवड्यातून एकदा दोनदाच आंघोळ करतात. अशा परिस्थितीत तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, रोज आंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण असे नसून अंघोळ न केल्याने शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात. होय! तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे हिवाळ्यामध्ये अंघोळ न करण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. त्या फायद्याबद्दल आम्ही आज तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.
हिवाळ्यात दररोज अंघोळ न केल्याने त्वचा स्वतःची स्वच्छता स्वतः करते
हिवाळ्यामध्ये जर तुम्ही दररोज आंघोळ केली तर तुमची त्वचा एलर्जीची शिकार होऊ शकते. कारण दररोज आंघोळ केल्याने त्वचेला गरजेपेक्षा जास्त ओलावा मिळतो. लोक दररोज आंघोळ करतात ते अस्वच्छतेमुळे नव्हे तर समाजात चांगले दिसावे म्हणून असे त्वचारोग तज्ञांनी सांगितले आहे. त्याचबरोबर अनेक अभ्यासांमध्ये असे समोर आले आहे की, त्वचा स्वतःची स्वच्छता स्वतः करू शकते. जर एखादी व्यक्ती दररोज व्यायाम शाळेत जात असेल किंवा धूळ मातीमध्ये राहत असेल तर त्यांना रोज आंघोळ करण्याची गरज आहे.
दररोज आंघोळ केल्याने त्वचेमध्ये कोरडेपणा वाढतो
हिवाळ्यामध्ये लोक सहसा गरम पाण्याने आंघोळ करतात. पण जास्त वेळ गरम पाण्यामध्ये राहिल्याने त्वचेला नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर त्वचेवरील कोरडेपणा देखील वाढू शकतो. कारण गरम पाणी शरीरातील नैसर्गिक तेल काढून टाकते. त्यामुळे जर तुम्ही दररोज गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर पाच ते आठ मिनिटांमध्ये आंघोळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमची त्वचा सुरक्षित राहील आणि तुमच्या त्वचेवरील कोरडेपणाची समस्या कमी होईल.
हिवाळ्यामध्ये दररोज आंघोळ केल्याने नखांना नुकसान पोहोचते
दररोज गरम पाण्याने अंघोळ केल्यास नखांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आंघोळ करताना नखे पाणी शोषून घेतात आणि त्यानंतर ते मऊ पडतात. मऊ पडल्यावर नखांची तुटण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर गरम पाण्यात आंघोळ केल्याने नखांवरचे नैसर्गिक तेलही निघून जाते त्यामुळे नखे कोरडे आणि कमजोर होऊ लागतात.
गरम पाण्याने आंघोळ केल्यास चांगले बॅक्टेरिया मारतात
आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या त्वचेमध्ये अनेक चांगले बॅक्टेरिया तयार होतात जे शरीराला सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकतात. अशा परिस्थितीत रोज आंघोळ केल्याने शरीरावर नैसर्गिक तेल निघून जाते त्यामुळे शरीरातील चांगला बॅक्टेरिया देखील नाहीसा होतो. परिणामी आपली रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari | “आव्हाडांना राजकीय जीवनातून संपविण्याचे कटकारस्थान” ; अमोल मिटकरी यांचे सूचक ट्विट
- Jitendra Awhad | आरोपांबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड झाले भावूक; म्हणाले, “माझ्या खुनाचं षडयंत्र रचलं असतं तरी…”
- Eknath Shinde | ५० नाही हजार खोके विकासासाठी दिले – एकनाथ शिंदे
- IPL 2023 | दिल्ली कॅपिटल्स मधून बाहेर पडल्यानंतर शार्दुल ठाकूर करणार ‘या’ संघाचे प्रतिनिधित्व
- Nilesh Lanke | “आव्हाडांवर ७२ तासात दोन गुन्हे दाखल” ; निलेश लंके यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
