🕒 1 min read
Amol Mitkari | मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. दोन दिवसांपूर्वी सिनेमागृहात हर हर महादेव या चित्रपटाच्या शोदरम्यान मारहाण केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता त्यांच्यावर एका महिलेचा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ३५४ अन्वये एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
“ज्या निच पातळीवरचे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे ही महाराष्ट्रातील तरुणांसाठी धोक्याची घंटा तर आहेच. शिवाय पुरोगामी चळवळीतील लोकांसाठी हा काळ अत्यंत त्रासदायक आहे. अशी सैतानी प्रवृत्ती पुरोगामी लोकांना जगू देणार नाही. जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करून राजकीय जीवनातून संपविण्याचे कटकारस्थान आखले गेले. हे पाहून आगामी काळात राजकारण हे क्षेत्र निवडावे की नाही असा मोठा प्रश्न पडला आहे. भविष्यात अशा घाणेरड्या राजकारणात सामान्य कुटुंबातील मुलं येणार नाहीत,” असे अमोल मिटकरी म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांचेवर ज्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करून राजकीय जीवनातुन संपविण्याचे कटकारस्थान आखले गेले हे पाहून आगामी काळात राजकारण हे क्षेत्र निवडावे की नाही असा मोठा प्रश्न पडला आहे. भविष्यात अशा घाणेरड्या राजकारणात सामान्य कुटुंबातील मुलं येणार नाहीत.#saveconstitution
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 14, 2022
विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड-
लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला आहे, अशा शब्दात राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील संताप व्यक्त केला. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महत्त्वाचे विषय आहेत त्याला बगल देण्याचे काम होते, हे महाराष्ट्राला मारक आहे, असे अजित पवार म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले की, सरकारने लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहाता जर कोणी कायदा हाती घेतला, चूक केली, नियमाप्रमाणे वागले नाही तर जरूर कारवाई करावी. मात्र कारण नसताना नवीन कायदे नियमाचा आधार घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे, जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम कोणी करत असेल याकडे जनतेने जागरुकतेने पाहावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची आग्रही मागणी अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | ५० नाही हजार खोके विकासासाठी दिले – एकनाथ शिंदे
- IPL 2023 | दिल्ली कॅपिटल्स मधून बाहेर पडल्यानंतर शार्दुल ठाकूर करणार ‘या’ संघाचे प्रतिनिधित्व
- Nilesh Lanke | “आव्हाडांवर ७२ तासात दोन गुन्हे दाखल” ; निलेश लंके यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
- Jayant Patil | आव्हाडांवरील आरोपांवरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर निशाणा; म्हणाले, “मुद्दे नसले की गुद्द्यांवर…”
- Salaam Venky Trailer | माय-लेकाच्या कथेवर आधारित चित्रपट ‘सलाम वेंकी’चा ट्रेलर झाला रिलीज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
