🕒 1 min read
Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादीचे नेते(NCP) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर 72 तासात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर लावलेले आरोप आणि गुन्हे खोटे आहेत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा केली. आव्हाडांनी राजीनामा देऊ नये, असं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं. पण आव्हाड आपल्या निर्णयावर ठाम होते आणि अखेर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झालेले पाहायला मिळाले.
समाजात माझी मान खाली जाईन, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करायचा हा षडयंत्राचाच भाग असू शकतो असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “३०७, ३२३, ३२३ हे सगळे गुन्हे मला मान्य हे माझ्याहातून घडले आहेत आणि घडू शकतात. पण, ३५४ सारखा विनयभंगाचा गुन्हा अमान्य असून, जो मी आयुष्यात कधी केला नाही. पोलिसांनी हा गुन्हा कसा काय नोंद केला? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
त्याचबरोबर त्या महिलेने एफआयआरमध्ये वापरलेले शब्द व्हिडीओत स्पष्ट ऐकू येत आहेत. समाजात माझी मान खाली जाईन, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करायचा हा षडयंत्राचाच भाग असू शकतो,” असा आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलाय.
पुढे ते म्हणाले, माझ्या मुलीला तिच्या मैत्रिणीने विचारलं, ‘तुझ्या वडिलांनी विनयभंग केला का?’ इतक्या खालचं राजकारण सुरु असून यात न राहिलेलं बरं. माझ्या खुनाचं षडयंत्र रचलं असते, काही वाटलं नसते. पण, ३५४ कलम मनाला लागला असल्याचं म्हणत ते भावूक झाले. ३५४ आणि ३७६ साठी मी जन्माला आलो नाही. राजकारणात आक्रमकपणा नवीन नाही. खालच्या पातळीवरील राजकारण महाराष्ट्रात होऊ नये. यामुळे घरे उद्ध्वस्त होतील, असंही आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबणाची मागणी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नैतिकता असले तर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर जेवढे गुन्हे दाखल झाले. त्याचे फुटेज उपलब्ध आहे. या महाराष्ट्रात तुम्ही काहीही कराल का? आता दिलीप वळसे पाटील गृहमंत्री नाहीत तर देवेंद्र फडणवीस आहेत. शरद पवार, अजित पवार यांना माझी विनंती आहे. जितेंद्र आव्हाडांना निलंबित करा.”
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | आव्हाडांवरील आरोपांवरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर निशाणा; म्हणाले, “मुद्दे नसले की गुद्द्यांवर…”
- Salaam Venky Trailer | माय-लेकाच्या कथेवर आधारित चित्रपट ‘सलाम वेंकी’चा ट्रेलर झाला रिलीज
- Chandrashekhar Bawankule | राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाडांना निलंबित करावं – चंद्रशेखर बावनकुळे
- Jayant Patil | “जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला”; जयंत पाटलांनी दिली माहिती
- Sunil Shende Death | दिग्गज अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन, बॉलीवूड मध्ये पसरली शोककळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
