Share

बार्ज दुर्घटना प्रकरणी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा – शेलार

Published On: 

मुंबई – ओएनजीसीच्या एफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंत्राटदार कंपनीने केलेल्या हव्यासापोटी सुमारे 80 जणांचे जीव धोक्यात घालण्यात आले पैकी 25 जणांचे मृत्यू झाला तर उर्वरित अद्याप बेपत्ता आहेत. हे या कंत्राटदार कंपनीचे बेपर्वाईचे बळी असल्याने या कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणाची चौकशी भकटवून, पिढीतांना न्यायापासून लटकवण्याचे काम राज्य शासनातील झारितील शुक्राचार्य कोण? असा गर्भित सवाल ही भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

तौत्के चक्रीवादळामुळे समुद्रात बार्ज दुर्घटना प्रकरणी आज अखिल भारतीय नाविक संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतल्या नंतर आमदार अँड आशिष शेलार यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत घेऊन याबाबत सविस्तर भूमिका मांडली.सदर दुर्घटनेप्रकरणी बार्जचे कॅप्टन राकेश बल्लव यांनी बार्ज वेळीच न हलवता इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. या अपघातामधील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र ही बाब वस्तुस्थितीला धरुन आहे असे वाटत नाही. या दुर्घटनेला केवळ कॅप्टनालाच कसे जबाबदार धरता येईल?. सदर बार्जचे कंत्राटदार कंपनी या घटनेला सर्वस्वी जबाबदार आहे. मात्र कंपनी यातून पळ काढू पाहत असल्याने त्या कंत्राटदार कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे सांगत आमदार आशिष शेलार यांनी काही महत्त्वाच्या मुद्यांवर पोलीसांचे लक्ष वेधले आहे.

ही घटना घडताच केंद्र सरकारने चौकशी करण्याचे घोषित केले. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने तातडीने पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्र्यांच्या राजिनाम्याची मागणी केली. तेव्हाच आमच्या मनात पाल चुकचुकली होती. कारण काँग्रेस राष्ट्रवादीला प्रत्येक घटनेत राजकारण करण्याचा महारोग जढला आहे. सदर घटनेचा दोष केवळ कँप्टनवर टाकुन या कंत्राटदार एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक शहापूरजी पालनजी, तसेच संचालक प्रेम शिवम्, अश्विनी कुमार आणि पै यांना वाचवण्यासाठी राज्य शासन आणि त्यांचे पोलीस का करीत आहेत. जे कप्तान अद्याप सापडलेले नाहीत. ते आपली बाजू मांडू शकलेले नाहीत अशांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन राज्य शासनाला कुणाला वाचवायचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत त्यामुळे त्यांनी या प्रकरणातील खऱ्या दोषींवर कारवाई करुन पिढीताना न्याय द्यावा अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!