🕒 1 min read
पुणे: पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मूळ मुठा नदी सुधार प्रकल्प राबवला जाणार आहे. त्याला नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली. या मुळा- मुठा नदी सुधार प्रकल्पांतर्गत पुणेकरांचा लाडका ”बाबा भिडे पूल” पाडण्यात येणार आहे. पुणे शहरातील मध्यभागी असलेला बाबा भिडे पूल, पुणेकरांसाठी पर्जन्यमान मोजायला हक्काचा पूल आहे.
भिडे पूल पाण्याखाली गेला म्हणजे पुणे शहरात पाऊस मोठ्या प्रमाणात पडला असे आजही शहरात म्हंटले जाते. डेक्कन आणि नारायण पेठ या पुणे शहरातील दोन मध्यभागी असलेल्या ठिकाणांना भिडे पूल जोडतो. मात्र हा बाबा भिडे पूल आता नदी सुधारणा प्रकल्पामुळे पाडला जाणार आहे. हा भिडे पूल मुठा नदीवर स्थित आहे. पुणे महापालिकेच्या वतीने मूळ मुठा नदी सुधार प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्यात हा ” बाबा भिडे पूल” पाडला जाणार आहे.
मात्र याजागी डेक्कन परिसरातच बाबा भिडे पूल पाडून नवीन उंचीचा पूल बांधण्यात येणार आहे अशी माहिती आज पुणे महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मुळा मुठा नदी सुधारणा प्रकल्पामुळे बाबा भिडे पूल तर पाडला जाणारच आहे मात्र नदीपात्रातील रस्ता देखील यामुळे बंद होणार आहे. गुजरातमधील साबरमती नदीच्या (Sabarmati River) धर्तीवर पुणे (Pune) शहरातील मुळा मुठा नदीच्या (Mula Mutha River) प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. संपूर्ण प्रकल्पाला 4 हजार 727 कोटींचा येणार खर्च अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘कॉंग्रेसला मत म्हणजे…’; अरविंद केजरीवालांची कॉंग्रेसवर टीका
- खो खो या खेळात होणार आमूलाग्र बदल
- जनतेशी नाळ असलेला नेता, चोपदारच्या लेक-जावयाची केली विचारपूस
- U19WC: फायनलमध्ये पोहचल्यानंतर कर्णधार यशला वडिलांकडून मोलाचा सल्ला
- स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकासोबत क्रिस गेलचा फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
