जालना: औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील मुरमा फाट्याजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या हा अपघात झाला. मुस्तफा लालाखाँ पठाण (३५), कडुभाऊ निवृत्ती काशीद (३५, दुनगाव) अशी मृतांची नावे आहेत.
अंबड तालुक्यातील दुनगाव दर्गा येथील मुस्तफा लालाखाँ पठाण आणि कडुभाऊ निवृत्ती काशीद हे मिस्त्रीचे कामाचे साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून पाचोडकडे जात होते. दरम्यान, औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील मुरमा फाट्याजवळ बीडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात मुस्तफा पठाण हे जागीच ठार झाले, तर कडुभाऊ काशीद गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून औरंगाबाद येथे हलवण्यात येत असताना रस्त्यानेच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन पाचोड ग्रामीण रुग्णालयात करण्यात येऊन दोघांवर दुनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- दोन अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या दोन नवरदेवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल
- औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलनिमित्त शॉर्टफिल्म स्पर्धेचं आयोजन
- प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून पठ्ठ्याने चोरली दुचाकी; सेलू येथील घटना
- आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

